एकदा मला सकाळी लवकर मुलाखतीला जायचे होते. पण (नेहमीप्रमाणे) मला उठायला उशीर झाला. त्यामुळे डोक्यात मुलाखतीचेच विचार. मी आंघोळ करुन आलो आणि आईशी बोलतच मी आवरायला बेडरूममध्ये गेलो. मुलाखतीच्या विचारातच बनियन घातले...... आणि ........
...पुढची ५ मिनीटे बनियन शोधत बसलो. माझा त्रागा ऐकून आई खोलीत आली आणि हसायलाच लागली.. पुढे २ दिवस आई ते आठवून हसत होती..
माझ लग्न झाल्यावर आई हा कीस्सा माझ्या बायकोला सांगणार आहे.. ः(