साष्टांग नमस्कार विनंती विशेष,
तुमच्या भावनेचा भर ओसरला असावा अशी आशा करते. कारण हे भर, पूर आणि तत्सम प्रकार माणसाला कमकुवत करतात.
यापूर्वीच्या चर्चेत मंदारराव काय म्हणताहेत याचा अर्थ लोकांना लागत नव्हता, नंतर मी काय म्हणत्ये याचा अर्थ त्यांना लागत नव्हता. आता तुम्ही काय म्हणता याचा अर्थ "म्या पामराला" लागत नाहिये. असो.. वाचून इतर मनोगतींची करमणूक होत असेल अशी आशा आहे. (आपली तर जाम झाली बुवा!!!)
बरं एक सांगा.. हे अमेरिका कशापायी आलं हो मधेच. तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनीअर का? लई भारी हं. नाही आपण फक्त चूल आणि मूल सांभाळतो म्हणून तर इथे टाईमपास करायला वेळ आहे..... लई अडानी बगा!!! म्हणून राजा राम मोहन रॉय काय, आरक्षण काय, भगतसिंग, शिवाजी महाराज काय.. कोण हे लोक, ते मधेच का आले हो? आपल्याला फक्त अब्राहम लिंकन, जॉर्ज वॉशिंग्टन, क्लींटन, बुश एवढेच माहिती की हो.
तुमचा संदर्भ मी फक्त प्रखर/ शीतल एवढ्या पुरताच घेतला होता. पुढची वाक्य मंदार रावांसाठी होती.. तुम्ही भावनेच्या भरात नितीमत्ता, मानसिकता काढून मोकळ्या झालात.
देवा!!! माफ कर या बाईंना त्या काय म्हणताहेत त्याची कल्पना त्यांना नाही. (मी अमेरिकेत ना..मग येशूच आठवायचा).. असो.
तेव्हा भावनेच्या भरात वाहू नका असा अनाहुत सल्ला देत्ये. आपल्याला "आरक्षणात" काडीचा रस नाही (मी अमेरिकेत ना) तुम्हाला तो राव सुचवताहेत तो सल्ला माना फारतर.
तात्या, गडबड घोटाळ्यांची चर्चा वाचून विसरभोळे झालात की काय? पण मी नाही हं! तेव्हा अंजलीताई, तुमचा अपमान करण्याचा हेतू नाही... हलकेच घ्या.
चला निघते, इथे सकाळ आहे. घरातला "कचरा" गोळा करायचा आहे.
(निर्लज्जम सदा सुखी) प्रियाली.