वाव्वा. दणदणीत, गोळीबंद गझल झाली आहे.
थैली बघून माझी गळतात सर्व बाणे
सुटती सुरेल ताना जाता फटीत नाणे
ही द्विपदी ज्यूकबॉक्सवरही असावी. :) ही थैली कश्याची, कुणाची आहे? बाणे काय होते?
लावून पैज मारे घोकीत ग्रंथ होते
ऐकून नांव माझे ते झोपले उताणे
छान.
केकाटतात कोणी, कोणी सुरात गाती
सार्याच पोपटांना मी फेकतोय दाणे
वाव्वा. फारच छान. उत्तम.
का कौतुके जुईला त्या मूर्ख मोगर्याची?
सार्या वनस्पतींचे विकतात बीबियाणे
वावावा. साऱ्या वनस्पतींची हवे काय?
मला वरील दोन द्विपदी /शेर सर्वाधिक आवडले.
कुंथून कैक वर्षे केला रियाज त्यांनी
वा! मैफलीत त्यांच्या मी घालतो उखाणे
छान. आवडला. पटला.:)
चुचकारुनी प्रजेला गोठ्यात बंद केले
ते घालती महात्मे माझीच पायताणे
ह्या शुतुरगुर्बापन हा दोष असावा असे मला वाटते. म्हणजे वरच्या ओळीत बहुवचन(प्रजेला) खालच्या ओळीत(माझीच) एकवचन. माझीच ऐवजी अमुचीच केल्यास हा दोष दूर होईल. जाणकारांना विचारीनच.
तो ध्यास! ती सचोटी! ते कष्ट! स्तोत्र चाले
तिसर्या पिढीत आता आहे बसून खाणे
छान. खालची ओळ फारच छान. आमचे मित्र कवी अनंत ढवळे ह्यांच्या -
कर्तृत्त्वाची कोरी पाने
गतकाळावर जगतो आहे
ह्या ओळी आठवल्या.
काही शेरांचा अर्थ अंदाजाने निघतो. पण स्पष्टता यायला हवी असे मला वाटते.
चित्तरंजन
डिसक्लेमर
मी ह्या क्षेत्रातला कुणी मोठा अधिकारी नाही. वाचकाधिकार वापरून आगाऊ सल्ले, टिप्पण्या, मते देत असतो.
अवांतर
रोहिणीताई, ऐ दिल मुझे बता दे पेक्षा सारे जहाँ से अच्छा हिंदोस्तां हमारा च्या चालीवर अधिक चांगली म्हणता येते आहे. :) म्हणून तर बघा. ह्या रचनेसाठी ऐ दिल मुझे बता दे चाल फार लाडिक वाटते.