मिलिंदजी,
सुंदर गझल...

आकाश-सागराचा क्षितिजी मिलाप जैसा
आभास तोच अपुल्या सहजीवनात आहे
हा शेर सर्वांत आवडला.

हल्ली कमीच होते काव्यात व्यक्त मानस
सूर्यास्त लेखनाचा दृष्टीपथात आहे ...
सूर्यास्तानंतर सूर्योदय येतोच... त्यामुळे चिंता नाही. 

ठेवून शब्द मागे अस्तास 'भृंग' जाऊ
एका मुक्या तमाची काळी प्रभात आहे
वा! वा!... मक्ता अप्रतिम आहे.
- कुमार

ता.क. 
काही शेर (उदा. अश्वमेध) जरा शब्दबंबाळ वाटले. थोडक्यात बरंच काही मांडताना / सांगताना असं झालं असावं असं वाटलं. (हे माझं मत.. चूक भूल द्यावी-घ्यावी).