खरंच छान विषय आहे... आणि प्रभाकर, तुमच्या "धांदरटपणाचे 'वरदान' बायकांना असते असे माझे आज पर्यंतचे निरीक्षण आहे. " या वाक्याला आमचे "अहो" अगदी सहमत असतील(अजून माझ्या नवऱ्याने हा लेख वाचलेला नाही).
स्वयंपाक करताना चुकून जास्त मीठ घालणे किव्हा मीठ घालायचे विसरूनच जाणे
जीन्स च्या खिशात घराची चावी ठेवून ति घरभर शोधणे.
आणि घरचे दार उघडल्यावर चावी दरवाज्यालाच लावून विसरून जाणे.
अस माझं बऱ्याचदा होत आणि आमच्या "अहो" ना मला "धांदरट" म्हणण्याची संधी मिळते.