धांदरटपणा करणाऱ्या बऱ्याच मोठ्या महिलावर्गाने आपला धांद.मोकळ्या मनाने कबूल केला हे खरच कौतुकास्पद आहे.आमच्याकडे असे झाल्यास हसना मना है,बंड्या हे तुझ्यासाठी सांगतोय.बायकोने केलेल्या धांद. चे कौतुकच करावे लागते स्क्रु ढिला वगैरे शेरे मारले तर आपलीच हाडे ढिली व्हायचा धोका असतो.येवढ्या सगळ्या धांद. च्या नमुन्यात एक मह्त्वाचा राहिला असे दिसते.तो म्हणजे लॅचची चावी घरात राहून घर बंद होणे.येवढा दुर्धर प्रसंग कुठलाच नसेल.माझ्या मुलाच्या मित्राच्या बायकोने पर्समध्ये घराच्या आणि कारच्या चाव्या ठेवल्या आणि पर्स आतच ठेऊन कारचे दार बंद केले.त्यानंतर घोटाळा निस्तरून घरात शिरायला त्याना तब्बल चार तास घालवावे लागले.माझ्या एका मित्राने त्यासाठी दारापाशी एक मोठा फळा लाऊन त्याच्यावर सर्व विसर पडणाऱ्या गोष्टींविषयी प्रश्नांची  यादीच लिहिली आहे,म्हणजे १)गॅस बंद केला आहे का?२)इस्त्री चालू नाही ना?इ.इ. फक्त बाहेर पडताना ती यादीच न वाचण्याचा धांद. होऊ नये.