मधल्या १/२ ओळी सोडून बाकीची कविता आठवली आहे. त्या ओळी कुणाय आठवल्यास कृपया लिहाल का?
काया मातीत मातीत तिफन चालते
तिफन चालते तिफन चालते
ईज नाचते थयथय ढग ढोल वाजवितो
ढोल वाजवितो ढग ढोल वाजवितो ॥
नंदीबैलाच्या जोडीले सदाशिव हाकारते
वटी बांधून पोटाले पाराबती उनारते
वटी पोटाले बांधते झोयी काटीले टांगते
झोयी काटीले टांगते त्यात तानुलं लळते
त्यात तानुलं लळते ढग बरसते...... ॥
काकरांत बीजवाई जसं हासरं चांदन
धरतीच्या आंगोपांगी लाळानवसाचं गोंदन
सरीवर सरी येती माती न्हातीधुती होते
तिचा कस्तुरीचा वास भूल जिवाले पाळते
भूल जिवाले पाळते वाट सांजीले पाहेते
मैना वाटुली पाहेते राघू तिफन हानते
राघू तिफन हानते ढग बरसते...... ॥
------------------
-----------
पानी भरले ढेकूळ लोनी पायाले वाटते
काया ढेकळांत डोया हिर्व सपन पाहेते
डोया सपन पाहेते काटा पायात रूतते
काटा पायात रूतते लाल रगत सांडते
लाल रगत सांडते हिर्व सपन फलते
हिर्व सपन फलते ढग बरसते....... ॥
-वरदा