छान तरही गझल.
भागते का भूक बोलाच्या कढीने ?
जेवण्याचे बेत मी शिजवू कशाला?
फारच छान. उत्तम. मक्ताही उत्तम आहे.
चित्तरंजन
अवांतर
दुसऱ्या गझलेचा कुठलाही एक मिसरा घेऊन लिहिलेल्या गझलेला तरही गझल म्हणतात. तरह म्हणजे इथे बुनियाद, पाया. सारखी नव्हे.
तरही गझल लिहिण्याची परंपरा जुनी आहे. तरही गझलेचे मुशायरेही होतात. वरील गझल सुरेश भटाच्या 'आसवांनी मी मला भिजवू कशाला?' ह्या मिसऱ्यावर रचलेली आहे.
त्या गझलेतले काही शेर असे -
आसवांनी मी मला भिजवू कशाला?
एवढेसे दुःख मी सजवू कशाला?
साय मी खातो मराठीच्या दुधाची
मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला?
मी असा कलदार कोठेही, कधीही
पावल्यांचवल्यांस मी खिजवू कशाला?
तरही गझलेसारखीच तज़मीन गझल. तिच्याबद्दल जाणकारांकडून शास्त्रशुद्ध माहिती घेतो आहे. मिळाल्यावर इथे टाकीनच. पण ही तज़मीन गझल नाही असे वाटते.