सांत्वनाची थाप
हसरा दिलासा
अगतिक डोळ्यांना
पेलणारा खुलासा

सुंदर. आश्वासक.

प्रत्यक्षात केईएम् सारख्या हॉस्पिटलात जरा वेगळं वातावरण अनुभवलं आहे. ते ह्याहून गंभीर, तरीही आशावादी चिंताग्रस्त सग्यासोयऱ्यांनी वाहणारं, रात्रीच्या भयाण शांततेत कण्हणारं, दुःखातिशयाने हृदय पिळवटून आक्रंदणारं, क्वचित सुहास्य मुद्रेने घरी जाणाऱ्यांचं अस पाहिलं आहे.

तरी पण, कविता चांगली आहे.