एक प्रसिद्ध लेखन एकदा सहकुटुंब-सहपरिवार प्रतापगडावर गेले होते. ते गड चढत होते तेंव्हा त्यांना गड उतरणारे एक कुटुंब भेटले. जुजबी ओळख होऊन दोन्ही कुटुंबे आपापल्या मार्गाला लागली.

लेखकांचे कुटुंब वर जाऊन स्थिरस्थावर होईतो, ते खाली जाणारे कुटुंब त्यांना घाईघाईने गडावर फिरताना दिसले. त्या परत आलेल्या गृहस्थांना विचारले असता ते 'ट्रँज़िस्टर' विसरले असल्याचे कळले. सदर लेखक महाशयांनी त्या विसराळू गृहस्थांची त्यांच्या तोंडावर यथेच्छ चेष्टा केली!

आपले गडभ्रमण आटोपून लेखक महोदय पायथ्याशी आले आणि दुसऱ्याक्षणी गडाच्या दिशेने पळत सुटले...कारण...

...आपल्या तान्ह्या मुलीला ते गडावरच विसरून आले होते!