उन्हाळ्याची सुटी चालू होती. आई-बाबा-ताई गावाला गेले होते. दहावीत जाणाऱ्या मुलांचे सुटीचे शिकवणीवर्ग चालू झाले होते. शिकवणीच्या ठिकाणी दूरध्वनी वाजला. जोश्यांचा* मुलाला सांगा त्यांच्या घराला आग लागली आहे.

जोश्यांचा मुलगा नुकत्याच हाती आलेल्या लुनावर स्वार होऊन वेगाने आणि गांगरलेल्या अवस्थेत घरी पोहोचला. पाहतो तो काय १५-२० माणसांचा घोळका जमला होता, अग्निशामकदलाची लाल गाडी दारात उभी होती आणि त्यातला एक जवान शिडी खिडकीतून आत पाहत होता. त्याला जाम घाम फुटला. पटकन दार उघडून आत गेले तर...

... तर दुधाच्या भांड्याचा जळून पार कोळसा झाला होता!

*नाव बदलले आहे.