चंद्राला स्त्रीलिंगी समजून हे काव्य लिहिले असेल हे पटत नाही. चंद्र वा त्याचे चांदणे चंचल म्हणण्याइतके अस्थिर नसते. त्याच्या कला, उगवणे, मावळणे हे पुरेसे सावकाश असते.  वाहती आकाशगंगा असे म्हटले आहे म्हणजे नेहमीच्या आकाशगंगेपेक्षा (जी स्थिर असते) वेगळे काहीतरी सूचित केले असावे.  तसेच गुंतविले जीव हे मंजीर की पायी तुझ्या वगैरे ओळींचा सुसंगत अर्थ लागत नाही.

नुसतेच प्रियकराने प्रेयसीला म्हटले हेही ठीक वाटत नाही. तसे असते तर आकाशगंगा, मेघाविण सौंदर्य पाहू दे ह्याचा काही संदर्भ लागत नाही.