अनु,
नेहमीप्रमाणेच जबरी लिहिले आहेस. हसणे कितीवेळ थांबतच नव्हते.
वरील यादीत ८,११ आणि १३ क्रमांक सोडले तर बाकी माझी यादी थोडीफार अशीच आहे!
अजून थोडी भरः
१. ऑम्लेट करताना अंडी ओट्यावर ठेवून फेटायला काटा चमचा शोधेपर्यंत अंडी गडगडणे तोपर्यंत चपळाईने पकडली तर ठीक नाहीतर..!
२. हातात घड्याळ लावलेले असले तरी शोधणे.
३. लांब दांड्याचे एखादे भांडे ओट्यावर अगदी कडेला ठेवणे.
अजून आठवले तर लिहिन.
अंजू