अर्थात हे सार्वत्रिक आहे असे म्हणता येणार नाही कारण मग आपण ती स्क्रीन असं का म्हणतो? पण वरीलप्रमाणे लिंग कळतनकळत बऱ्याचदा ठरवलं जातं.

व्यक्तिशः मी 'तो स्क्रीन' म्हणतो, आणि आजपर्यंत माझ्या माहितीतल्या मराठीभाषिकांकडून 'तो स्क्रीन' असेच ऐकलेले आहे (आपल्या तद्‌सदृश शब्दांच्या लिंगसाधर्म्याच्या नियमाप्रमाणे 'तो पडदा'शी साधर्म्य साधत असावे.), पण कोठेकोठे आपण म्हणता त्याप्रमाणे 'ती स्क्रीन' असा पाठभेद असणे अशक्य नसावे.

'ब्रेड', 'ट्रक', 'पेन' या शब्दांबाबत असे पाठभेद ऐकलेले आहेत.

बहुधा 'प्रचलित वापर' याव्यतिरिक्त यामागे काही नियम नसावा.

- टग्या.