युवकभारतीच्या एका पुस्तकात (म्हणजे अकरावी किंवा बारावीला) 'राणी' ही  जी. एं. ची कथा आहे. तेव्हा जीएंची पहिल्यांदा ओळख झाली. एक अत्यंत वयस्क आणि डोळ्यांनी अधू असणारे आजोबा आणि त्यांची 'राणी' ही नात यांची ही कथा.
     जीएंची शैलीच वेगळी. या कथेमध्ये आजोबांच्या मनातले विचार आणि आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी चित्रीत केल्या आहेत. शेवट वाचून तर डोळे भरून येतात.
   बहुतेक निळसांवळा या कथसंग्रहात ही कथा आहे. तेव्हापासून  जीए या नावाने जे एक वेगळे विश्व दाखवले त्याची ओढ अद्याप कायम आहे.

-ओंकार.