लेख आवडला. पु. शि. रेग्यांनी त्यांच्या कवितेत वापरलेला 'विप्रश्न' हा शब्द या लेखाला शीर्षक म्हणून समर्पक वाटेल.

-- पुन्हा निरागस व्हावं. शेतातल्या रिठ्याच्या झाडाखाली बसून मनसोक्त  रडावं. मन निरभ्र व्हावं, भल्याबुऱ्या सर्व विचारांचा निचरा व्हावा. कोरी पाटी घेऊन पुन्हा मुळाक्षरांपासून आयुष्य नव्याने गिरवायला सुरवात करावी. 

आणि

-- अजूनही काही बिघडलेलं नाही. सारं काही मनासारखं होऊ शकतं.

या दोन ध्रुवांत मन कायम गोता खात असतं, हे खरं आहे.

नंदन.

अवांतर --
एकच वाट का चोंखदळत नाहीस  यात चोखाळत हवे होते का, की मुद्दाम (विचारभग्न) वेगळे क्रियापद वापरले आहे?