तर गडबडघोटाळ्यात मी एकदा चुकुन टुथपेस्ट ऐवजी  शेव्हिंग क्रीमने दात घासण्याचा प्रयत्न केल्याचे आठवते.माझ्या मित्राने तर  एकदा कमालच केली, अंघोळ करून ऑफिसला जायला तयार झाल्यावर बायकोला म्हणाला,' मला आज फ़ार जाड झाल्यासारख वाटतेय.' त्याच्या बायकोने पाहिले तर खरोखरच त्याची जाडी वाढल्यासारखे दिसत होते पण तिने बारकाईने पाहिल्यावर मात्र तिच्या लक्षात आले आणि ती चक्क ओरडलीच'अहो आत टॉवेल तसाच ठेऊन त्यावर पँट घातलीय तुम्ही '!दुसऱ्या एका मित्राने असेच बायकोला विचारले 'आज माझी जीभ जरा जड झाल्यासारखी वाटते.'बायकोने पाहिले तर काय या पठ्ठ्याच्या जिभेवर पोस्टाच्या तिकिटांचा थर,पत्रांवर लावण्यासाठी ठेवलेला आणि लावायचा विसरलेला  !