आमीरखानने नर्मदा प्रश्नावर घेतलेली भूमिका योग्यच आहे.
`रील लाईफ' मधील हिरो `रीअल लाईफ' मध्ये झीरो असतात असा एक सार्वत्रिक आणि ब-याच प्रमाणात खरा असलेला हा समज आमीरने पुसून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचे याबद्दल अभिनंदन केले पाहिजे. काही जण म्हणतात विस्थापित काश्मीरी हिंदूंसाठी हा काहीच का करत नाही? पण त्याने मुलाखतीत स्पष्टपणे निर्वासित पंडितांसाठीही काळजी व्यक्त केली. गुजरातमधील नर्मदा प्रकल्पातील विस्थापित हे मुंबईत बाहेरून येऊन झोपड्या बांधून राहणा-यांप्रमाणे नाहीत. ते तेथील मूळ रहिवासीच आहेत. त्यांचे पुनर्वसन आधी करावे असे सुप्रीम कोर्टानेच सुनावल्यानंतरही ही दडपशाही कसली? अशा विचित्र वागण्यामुळे भाजप आपला मिळालेला जनाधार गमावून बसेल अशीच शक्यता अधिक आहे.गुजरात आणि गुजरात बाहेरही.