प्रियाली,

"शंकर म्हणजे काय" या बद्दल मला काय वाटते याचा विस्तार मी ३ तारखेला करेन. ५ जूनसाठी मी तो राखून ठेवला आहे. शंकराबद्दल चे हे माझे विचार पूर्णपणे व्यक्तिगत मत आहे. आवडेल त्यांना आवडेल न आवडेल त्यांनी सोडून द्यावे. यात आस्तिकता वा नास्तिकता यांचा काहीच संबंध नाही. नास्तिक या शब्दाची व्याख्या बहुसंख्येने असणा-या आस्तिकांनी बनवली आहे. मूर्तिपूजा मानणे वा न मानणे याचाही आस्तिकतेशी फारसा संबंध नाही. आपण म्हणता त्याप्रमाणे पाशात्य लोक मूर्तिपूजा फारसे मानत नसतील तर येशूच्या मूर्तीशिवाय असलेले चर्च शोधून दाखवा. ईश्वराचा आपल्याला भावेल तसा अर्थ काढण्यास असलेली मूभा (भाव तेथे देव म्हणतात ना?) हिंदू धर्मास महान बनवते, जरी आपल्या या धर्मात अनेक त्रूटी असल्या तरी. चर्चा भरकटू नये म्हणून फार लिहित नाही.