सचिन,
आपण जरी हे प्रियाली ताईंसाठी लिहिले असले तरी मला आपले बहुतेक विचार आवडले. जीवन किंवा चेतना म्हणजे नेमके काय आहे? याचा अर्थबोध अजूनही झालेला नाही. विज्ञानाला कमी लेखायचे नाही. खुद्द निसर्गातच विज्ञान ठायी ठायी दिसते. आनिमल प्लॅनेटवरील ऍटनबरोचे (किंवा अन्यही) प्रोग्राम पाहिले की निसर्गाच्या करामतीपुढे आश्चर्यकित व्हायला होते. या निसर्गालाच देव मानायला काय हरकत आहे? किंबहुना तशीच आपल्या पूर्वजांची संकल्पना असावी. पुढे पुढे ती संकल्पना विसरली जाऊन त्यातील प्रतीकांनाच आपण देव समजून राहिलो आहोत आणि खरी समस्या तिथे सुरू झाली. मग याच प्रतिकांना मानणारे विविध धर्म आले. त्यांच्यात संघर्ष सुरू झाले. या जगात देव,वंश आणि धर्म यावरून जेवढी युद्धे आणि प्राणहानी झाली असेल तेवढी कशावरूनच झाली नाही. विज्ञानानेच हे जग थोडे तरी जवळ आणले आहे. आपण आज हे जे मनोगत वर विचार मांडु शकतोय ते विज्ञानामुळेच. पण तेवढ्यावरून हुरळून न जाता ,विज्ञानाला सर्वश्रेष्ठ समजून निसर्गाशी फारकत घेण्याचे काहीच कारण नाही. निसर्ग जपला तरच आपण जगणार आहोत याचे भान आजच्या मानवाने ठेवले तर पुढील पिढ्या सुखाने जगू शकतील.
सचिन असेच लिहित रहा. इथे ब-याच मनोगतींचे विचार सारखे आहेत पण कुठेतरी कम्युनिकेशन गॅप असल्याने गैरसमज होत आहेत. ते टाळले तर खूप बरे होईल.एक सुसंवाद साधता येईल.
अहो, हेच तर ते सत्य आहे की आपण आहोत, ही सारी सृष्टी आहे, हे सगळे काही एका विज्ञानाच्या जोरावर नाही चालत! आधी सगळे अस्तित्वात आले, आणि मग त्यातले सो कॉल्ड "विज्ञान" आले/समजले तुम्हा आम्हाला, बरोबर ना!
हे सारे आधिच अस्तित्त्वात आहे. कसे? शतकानुशतके युगानुयुगे अव्याहत पणे चालु आहे... का? कसे? कोण चालवतो या सगळ्याला?
नक्कीच तिसरीच कोणीतरी शक्ती आहे. जे हे सगळे सांभाळतेय.
रासायनीक दृष्ट्या मृत आणि जीवंत शरीर सारखेच असते ना, पण माणुस जेव्हा मरतो, तेव्हा नक्की काय होते हे आजही "विज्ञानाला" समजले नाही... का?