होली ब्लड होली ग्रेल वाचलय. तस समजायला थोडस किचकट आहे कारण ख्रिश्चन धर्माची खूप पार्श्वभूमी समजवून घ्यायला लागते. त्या साठी इतर अवांतर वाचन ही लागते, नाहीतर फार डोक्यावरुन जाते. हे पुस्तक म्हणजे धावता आढावा, आलेख, चित्रण, मागोवा या प्रकारात मोडते. वाचायला खूप मजा येते पण बरेच ठिकाणी संदर्भ न लागल्याने काहीवेळा कंटाळवाणे वाटू शकते.
ब्राउन ने त्या संकल्पनेचा आधार घेउन सत्यासत्याची इतकी चांगली सरमिसळ केली आहे आणि दिलेल्या दाखल्यांनी उत्कंठा वाढवत नेली आहे. कादंबरीच्या रुपाने त्याने हे सर्व रोचक व वाचनिय केले.
काही वर्षांपूर्वी होली ब्लड होली ग्रेलच्या एका लेखकांची मुलाख़त पाहिली होती. त्यात त्यांनी जबाबदारी नाकारली होती म्हणजे 'आम्हाला काही खास म्हणायच नाही, आम्ही जे पाहिल ते लिहिल, अस असू शकत यावर टीप्पणी करु शकत नाही' अशी त्यांची भूमिका होती. परवाच एका कार्यक्रमात त्यांनी 'हो! अस असू शकत' अशी भूमिका घेतली.
विल्यम डॅफोचा १९८८ साली म्हणून एक सिनेमा प्रदर्शित झाला होता. "द लास्ट टेम्पटेशन ऑफ क्राईस्ट" जवळपास याच संकल्पनेवर आहे.
तो बऱ्याच देशात दाखवण्यास बंदी होती. ज्यांना रस आहे त्यांनी मिळाल्यास जरुर पहावा.
*खास म्हणजे जीजस आणि मेरी मॅग्देलिनच लग्न झाल होत.