(लाल अक्षरातील) काही शिफारशी शुद्धिचिकित्सकाच्या आहेत काही माझ्या. पण आता ही (खाली दिलेली) आपली कविता वाचनीय आणि आनंददायक झाली आहे असे वाटते.
कडव्यांचे क्रमांक १,२,३ असे मराठीत हवे होते. आपण 1,2,3 असे आंग्ल भाषेत का दिले आहेत कळण्यास मार्ग नाही.
बोलणारी झाडं हालणारी झाडं
खूप खूप मजेत गाणारी झाडं
झाडावरचं पान गळलं पाहा
गळताना त्याला लागलं पाहा
म्हणाल आयुष्य संपलं पाहा-1
झाडावरचं फुल फुललं पाहा
फुलताना खुद्कन हसलं पाहा
म्हणालं सगळे मजेत राहा-2
झाडावरचं फळ पिकलं पाहा
पिकताना ते लाजलं पाहा
म्हणालं सगळे मधुर व्हा-3