सदर पुस्तक मी वाचलेले नाही, परंतु आपला मुद्दा दखलपात्र आहे.
(एखादे पुस्तक) केवळ छापून आले आहे, किंवा बेस्टसेलर आहे, एवढ्याच भांडवलावर ते काही खरा इतिहास होत नाही. अनेकदा बेस्टसेलर बनण्यासाठी काय वाटेल तो मसाला सखोल अर्थपूर्ण / अभ्यासपूर्ण वाटणाऱ्या शब्दांतून दडपला जातो. डॉमिनिक लापिएर/लॅरी कॉलिन्स या जोडगोळीचे 'फ़्रीडम ऍट मिडनाइट' हे असेच एक तत्कालीन बेस्टसेलर होते, आणि त्यात सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्यात लैंगिक संबंध असल्याचा दावा केलेला आहे, हेही या संदर्भात विसरता येणार नाही.
दावे काय, कोणीही काहीही करावेत. त्याला काही अर्थ असतो, असे मला वाटत नाही.
एकंदरीत अशी पुस्तके 'मिठाच्या खड्याबरोबरच घ्यावीत' (इंग्रजी शब्दांतर), अशा मताचा मी आहे.
म्हणूनच 'दा विंची कोड', लापिएर/कॉलिन्स अथवा जेम्स लेन यांना एकच ('लवणस्फटिक') न्याय लागू पडावा, हे पटते.
- टग्या.