मला वाटत की स्निग्धाचा मुद्दा थोडासा वेगळा असावा... आपल्या मानसिकतेबद्दल ती बोलत असावी असं वाटतय.

दा व्हिंची कोड हे पुस्तक Fiction या प्रकारात मोडत असल्याने विरंगुळा आणि त्यात केलेल्या उल्लेखांवरुन मिळालेले अभ्यासास अधिक उपयुक्त दुवे एवढाच असावा. डॅन ब्राऊनने त्याला इतिहासाची झालर लावली असली तरीही. त्यातील भाग कोणी इतिहासाच्या पुस्तकात घालणार नाही.

स्वतः डॅन ब्राऊनची इतर पुस्तके पहाता त्याने लिहिलेली कादंबरी ही गल्लाभरु आहे. अर्थात यामुळे त्याने केलेले संशोधन व सत्यासत्याची सुरेख सरमिसळ यांची किंमत कमी होत नाही.

जेम्स लेनचे पुस्तक "इतिहास" या विषयात मोडते. ती कादंबरी नाही. त्यामुळे त्यातील सर्व भाग सत्य आहे हे वाचकाने समजावे असा आग्रह असणार. म्हणून मला वाटत नाही की या दोन्ही पुस्तकांना एका तराजूत तोलावे. (मी बरोबर बोलत्ये का जेम्स लेन/ इतिहास बाबत, नसल्यास कृपया माझा गैरसमज दूर करावा... मी प्रतिसाद बदलेन)

दा व्हिंची एक सुरेख कादंबरी आहे (Fiction) एवढेच पहावे.

पण दोन्ही पुस्तकांवरुन आपली मानसिकता की आपल्या आदर्शांना असे खोटे पाडले की कशा प्रतिक्रिया उमटतात ते पडताळून पहावे.

 चू. भू. द्या. घ्या.

प्रियाली