नमस्कार स्निग्धाजी !

खरेच ! या विषयामुळे अनेक धर्मांशी संबंधित अनेक वादग्रस्त प्रश्न चव्हाट्यावर येवू शकतात, आणि त्यातून निष्पन्न होणारे हे आपणास न पटणारे किंवा आपण स्वीकारू शकणार नाही असे असू शकते. पण इतिहास हा नेहमी भूतकाळाशी संबंधित असल्याने वर्तमानाची प्रत्यक्ष सिद्धता कधीच येवू शकणार नाही. आपण शक्यतो  सगळे ठोकताळे जुळवून एक सलग चित्र निर्माण करत असतो.

जेम्स् लेन् बाबत - त्याची कादंबरी खरे तर मी वाचलेली नाही. वाचल्यानंतरच काहीतरी लिहिता येणे शक्य आहे.

पण एक वेगळेपणा नोंदवावासा वाटतो तो असा की,

ख्रिस्ती धर्मीयांनीच या विषयाला अशी कादंबरी किंवा चित्रपट निर्माण करून हवा दिली आहे. याउलट, शिवाजीमहाराजांबद्दल कोणीही भारतीयाने असे विधान केलेले नाही. त्यामुळे कोणाचे मत अधिक विश्वासार्ह आहे, ते आपणच सांगावे.

आपल्या प्रतिक्रियेची वाट पहात आहे.

नीलेश.