आमच्या एका काकांनी आंघोळ झाल्यावर कपड्यांच्या दांडीवरून बनियनच्या ऐवजी दुसराच एक पांढरा कपडा खाली ओढला आणि अंगात घातला.

नंतर जेवण झाल्यावर पोटावरून हात फिरवत त्यांनी ढेकर दिली/दिला तेव्हा आम्हाला दिसले ते त्यांच्या "बनियन"मधून बाहेर आलेले छातीवरचे केस, आणि त्याखाली "बनियन"च्या नक्षीदार किनारीवर नाजुकसं कापडी गुलाबी फूल!

काकांनी चुकून काकूंची स्लिप अंगात घातली होती! आमची हहपुवा!

- कोंबडी