"मला असं वाटतं की मुलांशी मराठीतून बोलताना आपण पालक काही शब्दप्रयोग किंवा भावना हातच्या राखून ठेवतो. जणूकाही ती केवळ मोठ्यांची मक्तेदारी आहे."
- शब्दप्रयोग जे खुप अवघड आहेत, ते लपवणे जरुरी आहे.
डोक्यात प्रकाश पडण्याकरता उदाहरण देतोः
लहान मुलांना (१ - २ वर्ष) तुम्ही झणझणीत मटणाचा रस्सा द्याल का?
ज्यामुलांना अ ब क ड येत नाही, त्यांना मरावठी वाचता येईल का?
- भावना हातच्या राखून ठेवणे सुद्धा जरुरी आहे.
डोक्यात प्रकाश पडण्याकरता उदाहरण देतोः
तुमच्या मनातील काम, मद, मत्सर, क्रोध ईत्यादी भवना मुलांपासुन लपवण्यात शहाणपणा आहे.
"मुलांना त्या भावना इन्ग्लीश्मधून कळत असतील तर मराठीतून का कळू नयेत?"
- माझ्या घरी मुलांना ही अडचण नाही, तुम्हाला समजवुन सांगण्याची कला नाही.
आपण मोठ्यांनी "पचायला हलकी" आणि "पचायला जड" अशी भाषेची वर्गवारी का करावी?"
- खुपच संकुचीत विचार आहेत आपले, कोंबडीबाई. ही वर्गवारी फ़क्त भाषेत नाही, जिवनात खुप ठिकाणी आहे.
तात्पर्य काय? विचार करा म्हणजे डोके चालेल.