कुशंका,

१. सहली वरून परती संबंधीचे वाक्य दिशाभूल करणारे असावे का?
२. कंदीलच जळतो? की तेल (इत्यादी) संपते?
३. खऱ्या नावाने वावरणारे मनोगती मंद असतात असा सुप्त संदेश यात आहे का?

माणसाचा चालण्याचा वेग ताशी ३-६ किमी. मानल्यास पूल साधारण ०.०६९ (सातींसाठी) ते १.६६ (टग्यांसाठी) मीटर इतकाच आहे.  पळण्याची शक्यता गृहीत धरत आकडेमोड चालू आहे, परंतू अंतरे अविश्वसनीय प्रमाणात कमी होतील अशी भिती वाटते.

कंदीलाची प्रकाशन क्षमता (!) साधारण किती असावी? कंदील मध्ये लटकवण्याबाबत जागरुकतेने विचार करायची गरज आहे असे वाटते.

३० सेकंदच जळू शकणारा कंदील किती गरम होऊ शकेल यावर तज्ज्ञच प्रकाश टाकतील. (अर्थात इथे कंदील नुकताच सुरू केला असावा हे गृहीतक आहे.)

(हे कोडे वेगळ्या दृष्टीकोनाचे तर नव्हे !)

एकूणच या कोड्यामुळे टगोबांना बराच व्याप होणार आहे असे दिसते. ;)

(जमेल तितके हलके घ्या, नाहीतर जड जाईल!)

(हा प्रतिसाद त्याने लाल रंगात का असावा बरे? सोप्पे आहे इग्नोरतिओ एलेन्चि ;) )