लहान मुलांना (१ - २ वर्ष) तुम्ही झणझणीत मटणाचा रस्सा द्याल का? - भावना हातच्या राखून ठेवणे सुद्धा जरुरी आहे.
तीच मुले तोच विषय इंग्रजीतून ग्रहण करू शकतात (म्हणजे तुम्ही म्हणता त्या प्रमाणे रस्सा पचविण्याची ताकद त्यांच्यात आहे).
तुमच्या मनातील काम, मद, मत्सर, क्रोध ईत्यादी भवना मुलांपासुन लपवण्यात शहाणपणा आहे.
काम आणि मदाचा आणि वर चर्चिलेल्या (धर्म, युनिफॉर्म) वगैरे विषयांचा काय संबंध आहे?
खुपच संकुचीत विचार आहेत आपले, कोंबडीबाई. ही वर्गवारी फ़क्त भाषेत नाही, जिवनात खुप ठिकाणी आहे.
पुन्हा एकदा! "जिवनात खुप" ठिकाणी असलेल्या वर्गवारीचा इथे काय संबंध?
- कोंबडी
---
नितीनराव, तुम्ही चर्चेचा मूळ प्रस्ताव वाचला का नक्की? की मी तुमची "कमीतकमी पाच मुले दत्तक घ्यायची" सूचना न मानल्यामुळे रागावून, मिळेल तिथे मी चालू केलेल्या जुन्या चर्चा पुन्हा उकरून, "मूर्खपणा", "डोक्यात प्रकाश" वगैरे शब्द वापरून स्वतःचं समाधान करून घेताय? सदरहू चर्चा गेले चार महिने तुमच्या दृष्टीस कशी पडली नाही?
उगाच सैरावैरा धावू नका. कोंबडी हाती यायची नाही, आणि दमछाक मात्र होईल.
हे न पटल्यास अजून एक विनंती. माझ्या एखाद्या प्रतिसादाला उत्तर द्यायचे असेल तर "पिवळ्या फोल्डरखाली हिरवा बाण" असलेल्या चित्रावर टिचकी मारून फक्त त्या प्रतिसादापुरता प्रतिसाद द्या. इतर ठिकाणी केलेत तसे नवे धागे चालू करू नका. म्हणजे इतरांना त्याचा त्रास कमी होईल.