अमेरिका अतिरेक्यांप्रमाणे थंड डोक्याने कारस्थान आखून निरपराध लोकांना ठार मारत नाही.
इराकमधे जाऊन अमेरिकेने मूर्खपणा केला आहे हे खरे. त्याचा परिणाम म्हणून तिथे जास्त अतिरेकी निर्माण झाले आहेत आणि ते नरसंहार करत आहेत. हे लोक बायका मुले कुणालाही निर्दयपणे मारत आहेत. शिया आणि सुन्नी ज्या चेवाने एकमेकांचे लोक मारत आहेत ते क्रौर्य स्तिमित करणारे आहे. अमेरिकेच्या सैनिकांकडून काही आततायी कृत्ये नक्कीच झाली आहेत. ती विशिष्ट जाती वा धर्माचा नरसंहार म्हणण्याइतकी मोठी नाहीत. आणि अमेरिकन सरकार लाजेकाजेस्तव त्यांच्यावर कारवाईही करत आहे. अमेरिकेतील विरोधी पक्ष सरकारला ते करायला भाग पाडत आहे. एक बुश आततायी निघाला म्हणून समस्त अमेरिकेवर त्याचे खापर का फोडा?
अमेरिका हे एक लोकशाही राष्ट्र आहे. उगाच काहीच्या काही सनसनाटी लिहू नका.
जाता जाताः पोपने अमेरिकेने इराकावर हल्ला केला म्हणून टीका केली होती असे स्मरते. (चुभूद्याघ्या)