मागील भागांप्रमाणेच संवाद नाटकी आहेत.
पण एक मोठं, कधीही न संपणारं स्वगत संहितेने त्याच्या स्वप्नसंहितेत लिहून ठेवलं होतं.
तू जेव्हढ्या इंटेन्सिटीने माझ्यावर प्रेम करतोस, तेव्हढ्या किंवा त्यापेक्षा जास्त इंटेन्सिटीने मी तुझ्यात नाही गुंतलेय् रे. आणि तसं म्युच्युअल फ़ीलिंग नसेल तर आता आपल्यात जी मैत्री आहे, त्यापलीकडचं नातं गुंफण्यात काय अर्थ आहे?
राजेश खन्नाच्या 'अरे, नही रे गंगू' ची आठवण होते.
सरींवर सरी तसे क्लीशेंवर क्लीशे.
संहिता दुसऱ्या कोणात तरी गुंतली आहे, हे भैरवीकडून कळल्यावर तर अक्षय स्वतःचासुद्धा उरला नाही.
अशी मौक्तिके तिन्ही भागांत जागोंजागी विखुरली आहे. लेखिकेने रंगविलेला अक्षय हिंदी सिनेमातला ट्रॅजेडी कुमार वाटतो. व्यक्तिरेखा फिल्मी आहे. थोडक्यात एकूणच फुसका तिसरा अंक(१,२,३).