यांची कुठली गोष्ट आपल्याला आवडते ते कृपया सांगावे, म्हणजे वाचायला बरे!!
चिकू ,
तसे मीही फार वाचलेले नाही. पण अनुभव व थोडेसे चिंतन (खरेतर चिंता) करून एक गोष्ट लक्षात आली,ती सांगतो. एखादा लेखक वाचायला घेण्यापूर्वी त्या लेखकाचे चरित्र व एकूणच जीवनाची जडण कशी झाली हे माहित करून घ्यावे.त्याच वेळी त्या लेखकाच्या सर्व साहित्याची व त्या लेखकावर अन्य व्यक्तींनी लिहिलेल्या सर्व साहित्याची (विशेषतः Ph.Dचे प्रबंध) प्रथमावृत्तीच्या प्रकाशनाच्या वर्षक्रमाने सूची करून घ्यावी. वाचनही त्याच क्रमाने करावे. हा एक वेगळा आनंद असतो.यांत त्या क्रमाने पुस्तके न मिळण्याची मुख्य अडचण असते. पण प्रयत्न करावे.नंतर त्याच काळात लिहिले गेलेले अन्य लेखकांचे साहित्य वरील पद्धतीनेच वाचावे.याच बरोबर साहित्यशास्त्राचा अभ्यास करावा. टीपणेही काढावी. त्याचेही एक शास्त्र आहे. संशोधन पद्धतीचा अभ्यास कसा करावा याविषयीच्या पुस्तकांतून टीपणांविषयी माहिती मिळते.
धन्यवाद.
अवधूत.