मी फक्त IE वापरतो.  घरून किंवा कामावरून मनोगत उघडे ठेऊन इतर कामे करण्यात काहीच अडथळा येत नाही.  अर्थात कामावर अतिरुंद महामर्ग आहे आणि घरीसुद्धा थेट दूरध्वनी मार्ग (DSL) असल्याने ते सहज जमते.

माझ्यामते ही (मंद-हळू चलनाची) अडचण जुन्या कमी वेगाच्या संगणक चालकामुळे (प्रोसेसर) होते.  हल्ली नवे जलद वेगाने काम करणारे संगणक फार कमी किमतीमध्ये मिळतात.  तेव्हा जुने संगणक काढून किंवा त्यातले चालक आणि स्मरणसंचयाचे ऊर्ध्वीकरण करून तुम्हाला याचा सुखकर वापर करता येईल.

कलोअ,
सुभाष