वाचून मजा आली!!! पुण्याचा धक्का एवढा मोठा कि इथे अमेरिकेतही बसतो.

आमच्या मराठी मंडळाच्या गेल्या दिवाळी कार्यक्रमांची आमंत्रणे पाठवण्याबद्दल एक सभा होती. लोक वेळेवर येत नाही त्यामुळे कार्यक्रमांना उशीर होतो अशी कुरकुर काही मंडळींची होती. पुण्याच्या एका काकूंनी गंभीरपणे उपाय सुचवला.

"आमंत्रण पत्राखाली लिहा, ठिक ४.०० वाजता हजर व्हावे, त्यानंतर नाही आलात तरी चालेल."