मूळ मुद्दे मला वाटते हे होते की -

(१) मूळ इंग्लिश वाक्यांचे भाषांतर कसे करावे?   

माझ्या  मते,  पहिल्या प्रश्नाबाबतीत - भाषांतर अर्थवाही असावे, शब्दशः नसावे.  तो यांची भाषांतरे पटली, तरीही काही बाबतींत माझे पर्याय सुचविते. 

२. आय डोण्ट लाइक युनिफॉर्म्स. आय लाइक इट व्हेन एव्हरीवन वेअर्स क्लोद्स ऑफ देअर चॉइस. "दॅट्स हाउ वुई कॅन एक्स्प्रेस अवरसेल्व्हज."

मला युनिफॉर्म (किंवा गणवेष) नाही आवडत, मला प्रत्येकाने आपापल्या आवडीचेच कपडे घातलेले आवडतात.  त्यातूनच तर आपण लोकांना आपली ओळख करून देऊ शकतो.

३. "ही बिट्रेड.""त्याने (मला) फसवले "

(२) आपण मुलांशी बोलताना "काही शब्दप्रयोग किंवा भावना हातच्या राखून" ठेवतो का? 

 माझ्या मते, 'हल्लीची" मुले तर वेगळी आहेत, त्यांना कालपरत्वे अनेक गोष्टींचे अनुभव असतात, आणि अनुभव आले की विचार व्यक्त करावेसे वाटतात.   त्यांना स्थळ, काळ यांचे भान ठेवून काही विचारले/सांगितले तर त्यांची उत्तरे/ विचार आपल्याला चकित करून सोडू शकतात.  पण तरीही विषयांचे तारतम्य ठेवलेच पाहीजे, कारण ती शेवटी मुलेच असतात.  अर्थात "कोंबडी" यांनी मांडलेले विषय ९-१० वर्षांच्या मुलांसाठी अजिबातच वावगे वाटत नाहीत.

(३)  निरीक्षणाशी सहमत आहात का? 

हो, आणि नाही..  कारण मी वेगवेगळी घरे पाहीली आहेत, आणि प्रत्येक जण हा आपल्या आपल्या पद्धतीनं आपापल्या मुलांशी वागत असतो.   मध्यमवर्ग आणि समाजाचे इतर घटक हे सारख्याच प्रकारे मुलांशी वागत नाहीत.   एवढं मात्र वाटतं, की जास्तीत जास्त अनुभवांचं वैविध्य मात्र मराठी जनांमध्ये आलेलं बरं. 

सुहासिनी