विषयांतर - या चर्चेत हे विषयांतर आहे याची कल्पना आहे. विषयांतराबद्दल क्षमस्व.
त्या चर्चेतली दोहोंचे प्रतिसाद पाहिले.
दुमत, देशसेवा करण्यासाठी देशात राहणे गरजेचे आहे का? या मुद्यावर वाटते. ज्याचा 'देशाबाहेर राहणारे देशसेवा करत नाहीत/करू शकत नाहीत' असा अर्थ घेतल्याने वादास तोंड फुटले असे वाटते.
सार्वजनिक चर्चांमध्ये स्वतःशी संबंधित उदाहरणे दिल्यास उदाहरणांवर केलेली टिका व्यक्तिगत समजली जावून (वा तसे करण्याची संधी मिळून) नवनवे वाद निर्माण होतात असे वाटते. हे टाळता येणे सहज शक्य आहे.
५ अनाथ मुलांबद्दल 'ही केवळ सुचवणी आहे' असे नितीन रावांचे वाक्य बोलके ठरले असते असे वाटते.
कोंबडींच्या बाबतीत म्हणाल तर 'ऑम्लेटची चव चाखायला स्वतः अंडी द्यावी लागत नाहीत' ही म्हण त्यांना माहीत असावी. अर्थ- स्वतः अंडी न घालता देखील ऑम्लेटच्या चवीवर भाष्य करता येते. (जसे येथे तो करत आहे.) कोरडा पाषण ब्रम्हज्ञान देत असेल तर घेण्यास हरकत नसावी. नवे उपाय सुचवताना त्यावर स्वतः अंमलबजावणी अधीच केलीच असली पाहिजे हा हट्ट (चर्चेसाठी तरी) अनावश्यक आहे.
भाषेबद्दल - एक दुसऱ्याची विद्वत्ता जोखणे हे चर्चांचे प्रयोजन खचितच नसावे. शब्दच्छल, टोमणे हे सारे निखळ मनाने व 'केवळ सुचलेला विनोद' या कारणास्तव केलेले असावेत. अन्यथा 'कंपूगत' असावेत. खटकल्यास माफी मागण्याची खिलाडू वृत्ती प्रतिसादकात असावी.
तेंव्हा एकदुसऱ्याची अंडी पिल्ली बाहेर न काढता, (ती ही भलत्याच खुराड्यांतून!) चर्चा मूळ चर्चेत न्यावी ही विनंती.
टाळी एकाच हाताने वाजत नसल्याने नि पुरेश्या टाळ्या वाजल्या असल्याने (त्यांचे या सारखे पडसादही आहेत!) दोन्ही हातांनी विश्रांती घेऊन नव्या दम्याने, मूळ चर्चा मुद्याला धरून करायला हरकत नसावी.
प्रतिसादातील सर्व वाक्ये विधानार्थी, समजावणीच्या सुरातील आहेत. (हे देखील;)) विनोद केवळ विनोदा पुरते असून हरकत असल्यास हटवण्याची तयारी आहे. (हा विनोद नाही.)
मोक्याची सूचना - त्याचे मत हा त्याचा निवाडा नव्हे.
अवांतर - हसूनहसून अंडी देण्याच्या संकल्पनेने तो खो-खो हसला. (अंडी अर्थातच दिली नाहीत.)
'वाट्यां'ची ही चर्चा मूळ विषयावर यायला ही हरदासाची कथा पुरेशी लांबली आहे असे वाटते.