कोणत्या कंपनीचा मेक-अप वापरायचा हा वैयक्तिक प्रश्न आहे, तुमच्या बजेटप्रमाणे आणि त्वचेच्या प्रकारावर ते अवलंबून आहे. कोणत्याही चांगल्या, सुप्रसिद्ध कंपनीचा  मेक-अप तुम्ही वापरु शकता. पण स्वस्त मिळतोय म्हणून कोणताही मेक-अप वापरू नये, तुमच्या त्वचेसाठी ते चांगले नाही.

अमेरिकेत Neutrogena स्वस्त आणि चांगली कंपनी आहे. Bare minerals पण चांगली आहे. भारतात Lakme वापरायला काहीच हरकत नाही.  

१.  पापण्यांच्या केसांना लावायचा काळा रंग
मस्कारा.  मस्कारा काळ्या किंवा गडद चॉकलेटी रंगात मिळतो. तुमच्या रंगाला, पापण्यांना जो रंग चांगला दिसतो तो वापरावा.  पाण्यात जाण्याची शक्यता असल्यास, किंवा डोळे चोळण्याची सवय असल्यास, waterproof मस्कारा वापरावा. नाही तर तो फिस्कटतो आणि खूपच वाईट दिसते. पण एकूणच waterproof मेक-अप वापरणे चांगले नाही, तेव्हा रोजच्या वापरासाठी शक्यतो साधा मेक-अप वापरावा.

२.  काजळ लावायची पेन्सिल 
eye-liner, ह्यात सुद्धा काळा किंवा गडद चॉकलेटी रंग असतो.  

३.  पापण्यांच्या वर मॅचिंग साडी/पंजाबी सूट याप्रमाणे रंग लावतात
eye-shadow, सहसा डोळे छोटे असल्यास हलक्या रंगछटा वापरतात आणि डोळे मोठे असल्यास गडद.

४.  स्कीन क्रीम वापरतात ते कशासाठी
स्कीन क्रीमचे बरेच प्रकार असतात, जसे की मॉइश्चरायजर, सन-स्क्रीन,
सन-स्क्रिन उन्हापासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी वापरतात.
मॉइश्चरायजर त्वचा कोरडी असेल तर वापरले जाते.
कन्सीलर त्वचेवरचे डाग लपण्यासाठी वापरतात. जिथे डाग असेल फक्त तिथेच हे लावतात.
फाउंडेशन त्वचा नितळ दिसावी म्हणून लावतात. कन्सीलर लावल्यावर त्वचेवर मध्येमध्ये पांढरट पॅच दिसतात, त्वचा एकसारखी दिसावी म्हणून वरुन हे क्रीम लावतात.
फाउंडेशन लावल्यावर त्वचा एकसारखी दिसते, पण नैसर्गिकरित्या आपली त्वचा अशी नसल्यामुळे ते फारसे चांगले दिसत नाही, म्हणून गालाच्या उंचवट्यावर, नाकावर आणि हनुवटीच्या २ ही बाजूला काही ठिकाणी हलकेसे ब्लश लावतात, त्यामुळे त्वचा जास्त नैसर्गिक, पण नितळ वाटते, मेक-अप केलेले पटकन समजून येत नाही.

५.  शांपू, कंडीशनर कोणत्या कंपनीची चांगली
माहित नाही, मी आता डव्ह वापरते, पूर्वी पँटिन वापरायचे.

६.  पुरूष सौंदर्यप्रसाधने वापरतात का? असल्यास कोणती?
वापरतात, मॉइश्चरायजर, सन-स्क्रीन, शांपू, कंडीशनर, आफ्टर-शेव, अत्तरे, केसांना लावायचे जेल इ.