६. पुरूष सौंदर्यप्रसाधने वापरतात का? असल्यास कोणती?

'सरळमार्गी' पुरूष काही सौंदर्यप्रसाधने वापरतात. ती मुख्यतः ओल्ड स्पाईस, जिलेट, निवीया, पामोलिव आणि न्युट्राजिना या कंपन्यांची असतात. (ही यादी सर्वंसमावेशक नाही.)

सर्वात जास्त वापरला जाणारा प्रकार म्हणजे दाढी करायच्या आधी वापरायचा चेहऱ्याचा साबण. याने चेहरा स्वच्छ होतो, दाढीचे केस राठ न राहता मऊ होतात, तसेच यात 'मॉइश्चराईज़र' सुद्धा असतो, त्याने त्वचा कोरडी पडत नाहीत.

दाढीचे इतर सामानही सौंदर्यप्रसाधनात धरता येईल असे वाटते. तसेच दाढी करून झाल्यावर त्वचेवर लावण्यासाठी अनेक प्रकारची दाढीपरांत (आफ्टरशेव) मलमे आणि द्रव्ये मिळतात.

तसेच चेहरा सोडून इतरत्र वापरण्यासाठीची 'मॉइश्चराईज़र' मलमे सुद्धा उपलब्ध आहेत.

शरीरावर आणि कपड्यावर उडवायचे विविध अत्तरांचे फवारेही असतात. केसांचे मलम (हेअर जेल) असते.

या व्यतिरिक्त पुरुषांच्या सौंदर्यप्रसाधनांची मला माहिती नाही.