प्र. १ ते ५ बद्दल उत्कृष्ट माहिती, मैथिली. मला L'Oreal जास्त आवडत.
थोड्याफार अधिक सूचनाः
१. सन-स्क्रिन क्रिम उन्हापासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी वापरतात. हे वापरताना आपल्या त्वचेच्या गरजेनुसार त्यातील SPF चे प्रमाण पाहून घेणे.
२. दिवसाचा मेक-अप व संध्याकाळचा मेक-अप वेगवेगळा असावा. दिवसा सौम्य मेक-अप करावा. तर संध्याकाळी प्रसंगानुरुप थोडा गडद मेक-अप करावा.
३. शांपू आणि कंडिशनर आपल्या केसांच्या प्रकारा प्रमाणे निवडावेत. पुरुषांसाठी वेगळे शांपू आणि कंडिशनर मिळतात.
उत्तर-६
कालच भुवया कोरायला गेले होते तर समोरच्या सर्व खुर्च्यांत पुरुष आपल्या भुवया ठिक ठाक करत होते (अतिशयोक्ती नाही). ते हल्ली फेशिअल, मॅनिक्युअर, पेडिक्युअर, वॅक्सिंग ही करतात आणि त्यांनी ते त्यांना आवडत असल्यास कराव. तेव्हा त्यांची सौंदर्य प्रसाधने जसे की फेस पॅक, वॅक्स, केसांचे विविध रंग बाजारात मिळत असावेत.