मैथिली तसेच भोमेकाकांनी दिलेल्या उत्तरांना पुरवणी...

४. मॉइश्चरायजर त्वचा कोरडी असेल तर वापरले जाते - तसेच थंडीच्या दिवसात अंग उलू नये म्हणून सुद्धा हा मलम वापरता येतो. परंतू हा निवडताना काही काळजी घेणे आवश्यक आहे. बाजारात मिळणारी बहुतेक मलमे त्वचेला चांगली नसतात कारण ते कितीही धुतले तरी पूर्णपणे त्वचेवरून निघून जात नाहीत. त्यासाठी उच्च प्रतीचे प्रमाणपत्रे असणारी मलमे वापरावीत. आम्ही टॉल्सम (मी), आर्टिस्ट्री (सौ), सॅटनिक (बदल म्हणून दोघेही) या कंपन्यांची मलमे वापरतो. यांच्या किमती जास्त आहेत परंतू वापरायला सुरू केल्यावर त्यांचे उजवेपण लक्षात येते.

५. शांपू, कंडीशनर कोणत्या कंपनीची चांगली
माहित नाही, मी आता डव्ह वापरते, पूर्वी पँटिन वापरायचे.
आम्ही सुद्धा पूर्वी वरील उत्पादने वापरायचो. परंतू त्वचेची चाचणी केल्यानंतर या उत्पादनांचे तोटे आमच्या लक्षात आले. यांच्या सारखी अनेक उत्पादने त्यांच्या जाहिरातीत सांगितले जाते त्यापेक्षा खूपच कमी लाभदायक असतात. आम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्या नंतर वरील उत्पादने वापरायला सुरू केले. सहा महिन्यानंतर आमच्या त्वचेच्या पुनर्तपासणी मध्ये खूप चांगले बदल झाल्याचे आढळून आले. (हे बदल झाले नसते तर त्यांनी सगळा खर्च परत देण्याचे आश्वासन दिले होते).

६.  पुरूष सौंदर्यप्रसाधने वापरतात का? असल्यास कोणती?
वापरतात, मॉइश्चरायजर, सन-स्क्रीन, शांपू, कंडीशनर, आफ्टर-शेव, अत्तरे, केसांना लावायचे जेल इ.
अत्तरांव्यतिरिक्त बाकी सगळे सौंदर्यप्रसाधने मी वरील तीन (टॉल्सम (मी), आर्टिस्ट्री (सौ), सॅटनिक (बदल म्हणून दोघेही) ) कंपन्यांचे वापरतो. या कंपन्यांकडून मी हे पदार्थ घाऊक किमतीने घेतो. अधिक माहिती हवी असल्यास व्य. नि. ने कळवा.

आवांतर - सौंदर्य प्रसाधनांबरोबरच त्वचेचे आरोग्य आहार, व्यायाम, आराम तसेच तुमच्या कामाच्या प्रकारावर अवलंबून आहे. आहारात कच्च्या भाज्या, फळे यांचे प्रमाण वाढवणे, खूप पाणी पिणे, किमान अर्धा तास योगासने व प्राणायाम करणे, आवश्यक तेवढा आराम करणे, सकाळी सुर्योदया अगोदर फिरायला जाऊन येणे, दररोज किमान एकदा तरी विनोदावर खळखळून हसणे, प्रदूषणापासून चेहऱ्याचा/शरीराचा बचाव करणे, आशा सवयींचा सौंदर्य प्रसाधनांपेक्षाही जास्त फायदा होतो.