तुम्ही सर्वांनी खूपच छान सविस्तर माहिती दिली आहे त्याबद्दल धन्यवाद. मैथिली तुमचे विशेष धन्यवाद.

मला मेंदी आणि हेअर कलर यामध्ये हेअर कलर वापरणे जास्ती सोयीचे वाटते. मेंदीमधे ती आधी भिजवा, मग लावा. नंतर २ ते ३ तास थांबा व नंतर केस धुवा. त्याप्रमाणात हेअर कलर वापरणे सोपे वाटते, त्यातुनही रेव्हलॉनचा हेअर कलर तर १० मिनिटे लावला तरी पुरतो.  गार्निअर हेअर कलर जास्ती चांगले आहे का? रेव्हलॉनचा एक कलर वापरत असता तोच कलर दुसऱ्या कंपनीचा वापरला तर चालतो का? शेड मधे काही फरक पडतो का? (उदा. आधी रेव्हलॉन व नंतर गार्निअर असे)

कंडीशनर व शांपू यामध्ये काय फरक आहे?