मलाही हेअर कलर आवडतो. सोयिस्कर वाटतो. त्यातून मेंदीने माझे केस राठ झाल्या सारखे वाटतात. हेअर कलर ही मला L'oreal चा आवडतो. दुसऱ्या कंपनीचे मी पूर्वी वापरुन पाहिले आहेत त्याने फारसा वाईट फरक पडला नाही तेव्हा वेगळ्या कंपन्याचे रंग वापरायचा प्रयोग करुन आपल्याला कोणता जास्त चांगला वाटतो ते बघायला हरकत नाही. शेड मधे तुम्ही नक्की कोणता रंग घेताय याने फरक पडेलच.

पण रंगवलेल्या केसांसाठी धुताना कंडीशनर जरुर वापरा. शांपू हा साबणा सारखा केस स्वच्छ करण्यास वापरतात आणि धुतलेले केस मऊ पडावेत, त्यांची चमक वाढावी याकारणांसाठी कंडीशनर वापरावा. प्रथम शांपू करुन केस स्वछ झाले की कंडीशनर २ मिनीटे सर्वकडून सारखा लावून ठेवावा आणि नंतरच धुवावा.