चक्रपाणी,
धन्यवाद. भावना पोचल्या, समजल्या. सहानुभूती आहे. वरील टीकात्मक कवनाची प्रेरणा मला मनोगतावरील भावविव्हल, प्रेमविव्हल फुसक्या लेखनावरून, तसेच काही सर्वस्वी अप्रामाणिक जळकुकड्या 'चोखंदळ' प्रतिसादांवरून, मिळाली.

प्रेमात सह्य सारे आणि शिव्या दे विशेष आवडले. ते ज़रा बरे आहे.

ओ, कमॉन :):) चक्रपाणी. हा 'चोखंदळ' प्रतिसाद खरेच मनोरंजक आहे. तुमच्याच शब्दात सांगायचे तर 'बाकी (मला) यात खास काही वाटले नाही.' :):):)

बांडी मुज़ोरी हा वैदर्भीय शब्दप्रयोग वाटतो.
हो. नक्कीच. वाईट वाटून घेऊ नका. प्लीज हां!! 

मात्र नागपूरच्या एका स्नेह्यांशी बोलताना त्यांनी तो वापरल्याचे आठवते.
मीही अश्याच एका स्नेह्याकडून ऐकून वापरला आहे:):):) त्यानेच जळकुकडा हा शब्द सांगितला:)

असो. तुमच्यासारख्या साहित्यक्षेत्रात अल्पावधीतच अधिकारपदावर पोचलेल्या चोखंदळ कवीचे, रसिकाचे प्रतिसाद मला वरचेवर मिळत राहोत, हीच प्रभुचरणी प्रार्थना.


टीकाराम