श्री प्रवासींनी खालील करेक्शन्स करून दिले आहेत. प्रवासी आपल्या माझ्यावरील लोभाबद्दल आभार. प्रवासींनी सुचवलेले बदल मी अधोरेखीत केले आहेत.
१. पवित्र मज ला
पवित्र मज ला जळजळीत ती भूक श्रमातून फोफवणारी ।
पवित्र मज ला दगडी निद्रा दगडाची दूलई करणारी ॥
२.विनायकांचे सुनीत
स्वप्नी गाढ निमग्न भोज असता ये जागृति त्याजला
पाहे सुंदर मंदिरात भरली चंद्रप्रभा सोज्ज्वळा
जैसी कुंदलता फुलून खूलते ते स्थान शोभे तसे
(प्रश्ना उत्तर या प्रशांत मूनीने राया नकारी दिले)??
वरच्या ओळीत गाडी रुळावरुन खाली उतरलयासारखी वाटते.
नलदमयंतीआख्यान
म्हातारी उडता नयेचि तिजला माता मदिया अशी
कांता काय वदो नव प्रसव ते साता दिसांची तशी
पाता त्या उभयास मी मजविधी घातास योजितसे
हातामाजी नृपा तुझ्या गवसलो आता करावे कसे
येणे परिपरिसता अति दीन वाचा।
हेलावला नल पयोधि दयारसाचा ॥
सोडी, म्हणे विहर जा अथवा फिराया।
राहे यथा निज मनोरथ हंसराया॥
सुटूनी खग पळाला बैसला शालशाखे।
क्षणभर निजदेही मुक्ति-विश्रांती चाखे॥
-------------------------------।
-------------------------------॥
??? लवलाही परतला
नृपाळाचे स्कंधी बसुनि मणिबंधी उतरला
म्हणे हंसक्षोणीपतिस तुज कोणी सम नसे
दयेचाही ठेवा तुजजवळि देवा बहु वसे