कारकून महोदय, ग़जल आवडली नाही.

एखाद्या कवितेत एका कडव्यानंतर दुसरे कडवे, घाटातून जाताना एका वळणानंतर जसे दुसरे वळण येते तसे नैसर्गिकपणे यायला हवे असे मला वाटते. त्यांचा परस्परसंबंध हवा. कवितेची कथा सांगताना एका कडव्याने जिथे तोडली तिथुन दुसऱ्या कडव्याने ती उचलायला हवी, ती पुढे न्यायला हवी. मात्र आपल्या ग़जलेत असे होत नाही. शेर चांगले आहेत की नाहीत हा मुद्दा नाही, त्यांचा परस्परसंबंध कुठेच दिसत नाही. वेगवेगळ्या कल्पना घेऊन लिहिलेले हे शेर नाईलाजाने एकत्र आल्यासारखे वाटतात, त्यामुळे ग़जलेला काही अर्थच रहात नाही असे वाटते. असो, आपण काय म्हणता?

प्रामाणिक मत. राग नसावा.

आपलाच,

एक वात्रट