श्री. भाष यांचा लेख शास्त्रीय संगीत व चित्रपटगीते यातील नात्याविषयी योग्य दृष्टिकोन देणारा आहे व म्हणून स्वागतार्ह आहे.
मला वाटते की मनोगतावर असे कितीतरी संगीतप्रेमी (ऐकायला आवडणारे) असावेत की ज्यांना आपल्या संगीताच्या शास्त्राचे ज्ञान फारसे नाही पण ते मिळाले तर हवे असेल. असेही वाटते की जेवढे ज्ञान वाढेल तसे संगीतात अधिकाधिक रस घेता येतो व त्यातून तेवढे जास्त प्राप्त होते.
माझी ही धारणा बरोबर असली तर अशी एखादी प्राथमिक माहिती देणारी लेखमाला सुरु करावी का? ज्यांच्याकडे पेटी म्हणा, कीबोर्ड म्हणा, असे काहीतरी साधन असेल व जे त्याच्या सहाय्याने प्रयोग करून स्वरज्ञान, रागज्ञान मिळवू इच्छीत असतील, असे ८-१० सदस्य तरी मनोगतावर असतील का?
(जे जाणकार आहेत त्यांना काही शिकवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, तसा दावा मी अजिबात करत नाही.)
असा उत्साह असल्याचे जर कोणी मला कळवले तर मी लिहिण्यासाठी पुढे विचार/बेत करू शकेन. तात्या, भाष यांच्यासारखे लोक एक्स्पर्ट कॉमेंट देण्यासाठी उपलब्ध आहेतच.
दिगम्भा