साक्षी, उत्तर बरोबर ! अभिनंदन.
एक ३ अक्षरी ( फुलाचा ) अवयव (!) -
आहे त्याच क्रमात
पहिली दोन अक्षरे - एका देशाचे संक्षिप्त संबोधन !
शेवटची दोन अक्षरे - कौमार्यावस्थेतील फुल !
पहिलं आणि शेवटचं अक्षर - वेळ.
हा फुलाचा अवयव कोणता?
~!~
एक ३ अक्षरी (प्राण्याचे) खाद्य -
आहे त्याच क्रमात
पहिली दोन अक्षरे - बाजू.
शेवटची दोन अक्षरे - डबीचा भाऊ !
पहिलं आणि शेवटचं अक्षर ( उलट क्रमाने ) - शाळा-कॉलेजमधली एक आवश्यक गोष्ट !
प्राण्यांचे हे खाद्य कोणते?