वर अधिक लांबणावळ नको म्हणून हा किस्सा राखून ठेवला होता. वरील काही प्रतिसादांतून मिळालेल्या नावांनी खो खो हसावस वाटलच पण व्यक्तिशः माझ मत अस की ऐकायला गोड वाटणारी निरर्थक नावे ठेवायला हरकत नसावी पण अर्थाचा अनर्थ नको.

किस्सा तिसराः

अबूधाबीला असताना माझ्या ऑफिसमधे एक मल्याळी ख्रिश्चन सहकारी होत्या. त्यांच पाठच नाव दोन अक्षरी त्यामुळे होणाऱ्या बाळासाठी त्यांना लांबलचक ४-५ अक्षरी नाव हवे होते. भारतीय नाव ठेवण्याकडे त्यांचा कल असल्याने आम्ही त्यांना "अपराजीता", "परिणिता" सारखी नाव सुचवली होती. (मुलगा झाल्यास वेगळी होती, अर्थातच).

मूल झाल्यावर हॉस्पिटलमधे लगेच नाव विचारतात. यांना मुलगी झाली तेव्हा यांच्या नवऱ्याने सांगून टाकले "महानिर्वाणा".

चला! कलोअ

(रजेवर) प्रियाली