एक ३ अक्षरी पक्षाचे नाव (राजकीयही नाही आणि उडणाराही नाही ! )-
पहिली दोन अक्षरे - धान्याला कीड लागल्यावर होणाऱ्या पीठाला वापरण्यात येणारे (गावंढळ भाषेतले (?!) ) संबोधन.
शेवटची दोन अक्षरे ( उलट क्रमाने ) - एक पुरुषी वस्त्र ! ( चु.भू.द्या.घ्या.)
पहिलं आणि शेवटचं अक्षर - एक पक्षी ! ( हा मात्र उडणारा ! )
हा पक्षी कोणता?
~!~
एक ३ अक्षरी वस्तूचे नाव
पहिली दोन अक्षरे - सारखा.
शेवटची दोन अक्षरे - एक हिंदी महिना.
पहिलं आणि शेवटचं अक्षर - एक मुलीचे नाव.
ही वस्तू कोणती?