धन्यवाद सोनाली,
प्रथम एकही अभिप्राय नव्हता, म्हणून वाटले की कोणालाच यात रस दिसत नाही, आपण उगाच एवढं सगळं केलं का काय. एकदा असंही वाटलं की कदाचित सर्व मनोगतींना हा तक्ता अगदी तोंडपाठ असेल, त्यांचा दररोजचा आहार अगदी यावरच आधारलेला असेल, आणि मलाच हे शहाणपण उशीरा सुचलेलं असेल. त्यामुळे सर्वजण मला हसत असतील. पण आपला अभिप्राय पाहून बरे वाटले. म्हणलं चला निदान मराठीत आणि एकत्रित स्वरुपात माहिती देण्याचं श्रेय तरी घ्यावं.
खरं तर हे सर्व वाचल्यावर ( आहारशास्त्राबाबत ) मला असे वाटू लागले आहे की खरी आदर्श गृहिणी ती, की जी आपल्या कुटुंबियांना हे सर्व जाणून योग्य तो आहार देईल.
पुर्वीच्या लोकांना यातलं शास्त्र कदाचित माहित नसेल, कदाचित केवळ अनुभवाच्या आधारावर त्यांनी काय कधी खावे याचे काही नियम केले असतील. पण ते प्रत्येक मुलगी, आपल्या आईने सांगितले तसे पुढे चालू ठेवायची. माझी आजी नेहेमी सांगायची.. "प्रत्येक गोष्टीला का? असं आम्ही विचारत नसू". तसं विचारायचं धाडस नसेलही कदाचित त्यांच्यात परंतु त्याचबरोबर जे आपली आई सांगते आहे, ते आपल्या भल्यासाठीचा आहे ही जाणिव असायची.
नंतर नवीन पिढी आली. की जी "का?" हा प्रश्न विचारू लागली. त्यांना जेव्हा कळलं की आईपाशी या "का?" चं उत्तर नाही, तेव्हा त्यांना वाटू लागले की यात काही तथ्यच नसावे. काहींना उत्तर मिळतही असेल पण ते शास्त्रीय भाषेत नसेल.
पण मला असे वाटते, की जर वरील तक्ता वाचला, आणि थोडा जरी विचार केला तर असे कळून येईल की आपली आजी जे सांगायची त्यात बरंच तथ्य असायचं.
विशेषत: जेवण बनवण्यास वेळ कमी असलेल्यांनी तर जरुर हे वाचावे. अश्या लोकांचा बर्याचदा केवळ "ज्याने पोट भरेल" असे खाण्याकडे कल असतो. परंतु त्यानी जर वरील तक्ता वाचला, तर त्यांना हे जे काही पोटभरीचे आहे त्याचा दर्जा सुधारता येईल.
असो, तर लिहीण्यासारखे बरेच आहे, पण आधी सर्व मनोगतींना याबद्दल काय वाटतं हे जाणून घेण्यास उत्सुक आहे.
(उत्सुक) अमित चितळे